
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. हतीद येथील महादेव तुकाराम पवार ( वय वर्ष 67 ) आणि आशा महादेव पवार (वय 55 ) असे त्या पती पत्नीचे नाव असून ते आपल्या लंडनस्थित मुलाला भेटण्यासाठी जात होते.
महादेव पवार यांना दोन मुले असून एक मुलगा लंडनमध्ये तर दुसरा अहमदाबादमध्ये असतो. लंडन मधील मुलाचा बेकरी व्यवसाय आहे. तर अहमदाबाद मधील मुलगा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो.