
माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेले नवी मुंबईतील तीन जण शॉर्लोट तलावात बुडाले. अंघोळीसाठी तलावात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले. सह्याद्री रेस्क्यू टीमकडून तिघांचा शोध सुरू आहे. सुमित चव्हाण (16), आर्यन खोब्रागडे (19) आणि फिरोज शेख (19) अशी बुडालेल्या तिघांची नावे आहेत.
नवी मुंबई येथील 10 जणांचा ग्रुप माथेरान येथे सहलीला आला होता. यापैकी सुमित, आर्यन आणि फिरोज हे तिघेजण माथेरानमधील शॉर्लोट तलावात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही तलावात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि सह्याद्री रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. रेस्क्यू टीम तिघांचा शोध घेत आहे.