दरवाजावर खचाखच गर्दी; अंधेरीत एसी लोकलची रखडपट्टी

सामान्य लोकल ट्रेनबरोबरच आता एसी लोकल ट्रेनलाही पीक अवर्सला प्रचंड गर्दी होत आहे. मंगळवारी सायंकाळी पश्चिम रेल्वेवर चर्चगेटला जाणारी एसी लोकल खचाखच गर्दीमुळे अंधेरी स्थानकात जवळपास 15 मिनिटे रखडली. गर्दीमुळे एसी लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. रेल्वे पोलिसांनी काही प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर ती लोकल मार्गस्थ झाली. कामावरून घरी परतणाऱया नोकरदार मंडळींची एसी लोकलला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे त्या लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. ती लोकल जवळपास 15 मिनिटे अंधेरी स्थानकात थांबून राहिल्याने मागून येणाया इतर लोकल ट्रेनच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम झाला. पीक अवर्सला लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.