कमी खर्चात चटपटीत पाणीपुरी करा घरच्या घरी, आता बाहेर जाण्याची गरज नाही!

गोलगप्पा, पाणीपुरी, पुचका, बताशे नाव काहीही असो ही नावं ऐकताच तोंडाला पाणी सुटते. लहानांपासून ते आबालवृद्ध प्रत्येकाला आवडणारी चटपटीत पाणीपुरी खायची असेल तर आता बाहेर जाण्याची गरज नाही. घरच्या घरी पाणी पुरीच्या पुऱ्या करणं हे आता अगदी सहजसोप्पं झालेलं आहे. पाणीपुरीच्या पुऱ्या या रव्यापासून किंवा मैद्यापासून तयार केल्या जातात. परंतु काही पुऱ्या या अतिशय चिवट लागतात. आपण घरच्या घरी खुसखुशीत पाणी पुरीच्या पुऱ्या आता अगदी सहजपणे करुन पाणी पुरीचा मनसोक्त आनंद घरबसल्या लुटू शकतो.

तुमच्याही घरात पाणीपुरीचे फॅन असतील, तर आता पाणीपुरीची पुरी घरातच बनवा. साध्या सोप्या टिप्स लक्षात घेतल्या, तर घरी केलेल्या पुऱ्याही कुरकुरीत होतील.

परफेक्ट पाणीपुरीचे पाणी आता बनवा घरच्या घरी! या टिप्स वापरा बाजारातील पाणीपुरी होईल फेल

रव्याच्या पुऱ्या

तुम्ही रव्याची पुरी बनवणार असाल तर, सर्वात आधी गरम पाण्यात रवा मळून घ्यावा. असे केल्याने रवा चांगला फुगण्यास मदत होईल. तसेच या पुऱ्या चांगल्या फुगतील आणि कुरकुरीतही बनतील.

पुरी बनवण्यासाठी प्रथम रवा घ्या आणि गरम पाण्याने पीठ मळून घ्या. त्यानंतर, पीठ ओल्या कापडाने झाकून सुमारे अर्धा तास फुगू द्या. असे केल्याने रवा फुगेल आणि पुरी फुलण्यास मदत होईल.

रव्याची पुरी कुरकुरीत बनवण्यासाठी, तुम्ही रवा चांगला मळून घ्या. असे केल्याने रवा मिळून येईल आणि पुरी कुरकुरीत होण्यास मदत होईल.

रव्याची पुरी तळताना, तेल किती प्रमाणात तापले आहे याकडे लक्ष द्या. गोलगप्पा म्हणजेच पाणीपुरीची पुरी तळण्यासाठी तेल चांगले तापवायला हवे. कडक तेलात पुरी अतिशय उत्तम तळली जाते, आणि टमटमीत फुगते.