गोवंडी येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

गोवंडी येथील सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणी एका महिलेला अटक केली. पोलिसांनी एका महिलेसह दोन तरुणींची सुटका केली. त्याची रवानगी सुधारगृहात केली आहे. गोवंडी परिसरात एक महिला घरातून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती अंमलबजावणी शाखेला मिळाली. त्याआधारे बनावट ग्राहक पाठवून तिच्याकडे अल्पवयीन मुलीसह महिलेची मागणी केली. त्यानंतर तिने वेगवेगळे दर सांगून बनावट ग्राहकाला गोवंडी परिसरात बोलावले. पैशाचा सौदा झाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला.