पाकिस्तानसाठी हेरगिरी; जम्मूत जवानाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानची गुप्तर संस्था आयएसआयशी संबंध असल्याच्या आणि हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अमृतसर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यातील एक जण लष्करातील जवान असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पंजाब पोलिसांनी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली असून त्याअंतर्गत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुरप्रीत सिंग ऊर्फ गोपी फौजी आणि साहिल मसील ऊर्फ शाली अशी या दोघांची नावे आहेत. अमृतसर एसपी मनिंदर सिंग यांनी सांगितले की, गुरप्रित सिंग हा 2016 पासून हिंदुस्थानी लष्करात नोकरी करत असून त्याला अटक केली तेव्हा तो जम्मू येथे तैनात होता. तो आयएसआय अधिकाऱ्यांच्या थेट संपर्कात होता आणि हिंदुस्थानी लष्करासंबंधी संवेदनशील माहिती यूएसडी ड्राईव्हच्या मदतीने पाकिस्तानला पाठवत होता, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आल्याचे एस.एस.पी. सिंग यांनी सांगितले. गुरप्रीत याचा आयएसआय हॅण्डलर राणा जावेद याच्याशी थेट संपर्क होता, असेही ते म्हणाले.