
अहमदाबाद विमान अपघातातील एकूण 251 मृतदेहांचे डीएनए नमुने जुळवण्यात यश आले आहे. त्यापैकी 245 मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आल्याची माहिती आज अधिकाऱ्यांनी दिली.
भीषण विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटत नव्हती. मृतदेह अत्यंत विदारक अवस्थेत होते. त्यामुळे मृतदेहांचे डीएनए जुळवण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान अपघातात एकूण 270 जणांचा मृत्यू झाला. यात 241 प्रवाशांचा समावेश होता. तर एकमेव प्रवासी बचावला होता. एकूण 251 मृतदेहांचे डीएनए जुळवण्यात आले. त्यापैकी नातेवाईकांकडे सोपवण्यात आलेल्या 245 मृतदेहांमध्ये 176 हिंदुस्थानी, 49 ब्रिटीश, सात पोर्तुगीज आणि एका पॅनेडियन नागरिकाचा समावेश आहे.
खराब हवामानासाठी गाईडलाईन्स
खराब हवामानामुळे कुठलीही विमान दुर्घटना घडू नये यासाठी डीजीसीएने विमान पंपन्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. रात्रीच्या वेळी मुसळधार पावसात तसेच ओल्या धावपट्टीवर विमानांचे उड्डाण किंवा लँडिंग करता येईल की नाही याची खात्री किंवा शहानिशा वैमानिकांनी करून घ्यावी. त्यानुसारच विमान उड्डाणांचा निर्णय पंपन्यांनी घ्यावा असे डीजीसीएने म्हटले आहे.



























































