
आपल्याकडे केसगळती ही समस्या सर्वांनाच भेडसावते. खासकरुन पावसाळ्यामध्ये केसगळतीचे प्रमाण हे खूप वाढते. या केसगळतीमुळे अनेकदा टेन्शन येते. परंतु आता अजिबात टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेण्यापेक्षा फक्त 15 रुपये खर्च करा. केवळ या साध्या सोप्या उपायामुळे, केसगळती कमी होण्यास मदत होईल.
केसांसाठी घरगुती उपचार बऱ्याच काळापासून वापरले जात आहेत. केस मजबूत ठेवण्यासाठी, पोषण आणि केसांची काळजी या दोन्हीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पण, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यस्त जीवनशैलीमुळे केस कमकुवत होऊ लागतात. यामुळे केस गळती देखील वाढते. अशा परिस्थितीत बरेच जण मेथीदाण्याचा मास्क केसांना लावतात. पण त्यामुळे केस गळणे थांबते का? केस गळती कमी होते का?
मेथीदाणे हे केसांच्या वाढीसाठी खूपच प्रभावी मानले जातात. मेथी ही खऱ्या अर्थाने केसगळतीवर फार महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच मेथीदाण्यांपासून केलेल्या मास्कमुळे केसगळती जादुई गतीने थांबते.
केस गळतीच्या समस्येसाठी मेथी दाण्यांचा मास्क हा फारच फायदेशीर मानला जातो. मेथीदाणे दैनंदिन जीवनात आहारातही समाविष्ट केल्यास, केस गळती रोखण्यास मदत होऊ शकते.
मेथीच्या दाण्यांमध्ये प्रथिने, निकोटिनिक अॅसिड आणि लेसिथिनसारखे अनेक पोषक घटक आढळतात. हे पोषक घटक केसांना पोषण देण्यास आणि ते मजबूत करण्यास मदत करतात. हे हेअर मास्क लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात.
मेथीच्या मास्कमध्ये फायटोएस्ट्रोजेन असतात. हे आवश्यक संयुगे आहेत जे हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. हार्मोनल असंतुलनामुळे केस गळत असतील तर तुम्हाला याचे अनेक फायदे मिळतील.
केस गळती रोखण्यासाठी मेथीच्या दाण्याचा हेअर मास्क कसा बनवायचा?
एका भांड्यात 2 ते 3 चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. ते बारीक करून घट्ट पेस्ट तयार करा. ते दह्यामध्ये मिसळा आणि केसावर तसेच केसांच्या मूळाशी लावा. तसेच 20 ते 30 मिनिटे तसेच ठेवा. साध्या पाण्याने केस धुवा.
मेथीच्या मास्कमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. हे गुणधर्म संक्रमण रोखण्यास मदत करतात, ज्यामुळे केस गळती नियंत्रित होते. यामुळे डोक्यातील कोंडा आणि डोक्यावरील त्वचेची खाज दूर होते आणि केस निरोगी राहतात.
मेथीच्या हेअर मास्कमुळे डोक्यावरील त्वचेचे आरोग्य सुधारते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. यामुळे केस गळती कमी होते.
फक्त हा हेअर मास्क वापरल्याने केस गळती कमी होणार नाही. यासोबतच, तुम्हाला इतर घटकांकडेही लक्ष द्यावे लागेल.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)