
स्टेट बँक इंडिया (एसबीआय) मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर (एसबीओ) च्या 2600 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. या भरतीमध्ये सर्वसाधारण गटासाठी 1066, एससी 387, एसटी 190, ओबीसी 697 आणि आर्थिक मागास वर्ग 260 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. ही भरती मध्य प्रदेश, छत्तीसगड, जम्मू-कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांत केली जाणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती sbi.co.in/web/careers वर देण्यात आली आहे.