महाराष्ट्र दूध वितरक सेनेची कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी अनिल देसाई तर कार्याध्यक्षपदी राम कदम यांची नियुक्ती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि शिवसेना सचिव – खासदार आणि संघटनेचे प्रमुख सल्लागार अनिल देसाई यांच्या सल्ल्यानुसार महाराष्ट्र दूध वितरक सेनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सर्वसाधारण सभेत एकमताने महाराष्ट्र दूध वितरक सेनेची कार्यकारिणी पुढील तीन वर्षांकरिता जाहीर करण्यात आली आहे.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

अध्यक्ष – शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई, कार्याध्यक्ष – राम कदम, सहकार्याध्यक्ष – आदिनाथ हिरवे, उपाध्यक्ष – चंद्रकांत झगडे, सुहास शिवडवकर, तानाजी आरज, सरचिटणीस – सतीश सावंत, कोषाध्यक्ष – विलास भुजबळ, सचिव – कृष्णा घाटकर, गीता झगडे, रेखा संख्ये, राहुल साळकर, रवींद्र पाष्टे, प्रसाद नार्वेकर, अमित भुवड, प्रदीप बागायतकर, अनिल दळवी, प्रदीप इनामदार, सहसचिव – धर्मेश भट, पवन गायकवाड, अशोक वडगावकर, कैलास कांबळे, कार्यालय प्रमुख – आरीफ दळवी.