
एलआयसीच्या हाऊसिंग फायनान्सने गृहकर्जाच्या व्याजदरात .50 टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घोषणेमुळे एलआयसीचा गृहकर्जाचा व्याजदर वार्षिक 7.50 टक्क्यांपासून सुरू होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो रेटमध्ये कपात केली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर स्टेट बँक इंडिया, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँकेने कर्जाच्या व्याजदरात कपात करून ग्राहकांना दिलासा दिला आहे. त्यानंतर आता एलआयसीच्या फायनान्सने सुद्धा व्याजदरात कपात केलीय. युनियन बँकेचे गृहकर्ज व्याजदर सर्वात कमी 7.35 टक्क्यांपासून सुरू होते. एसबीआयच्या 7.50 टक्के, पंजाब नॅशनल बँक 7.50 टक्के, बँक ऑफ बडोदा 7.50 टक्के तर बँक ऑफ इंडियाचे व्याज दर 7.85 टक्क्यांपासून सुरू होते. याआधी सर्व बँकांचे व्याजदर जास्त होते.