224 हिंदुस्थानी इस्रायलमधून परतले

‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत आज सकाळी 224 हिंदुस्थानी नागरिक इस्रायलमधून मायदेशी परतले. इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधून आतापर्यंत 3 हजार 394 हिंदुस्थानींना मायदेशी परत आणण्यात आले. यापूर्वी 24 जून रोजी पहाटे 12 वाजण्याच्या सुमारास 282 हिंदुस्थानींना घेऊन एक विमान मशहदहून दिल्लीला पोहोचले. हिंदुस्थानी दूतावासाने मंगळवारी रात्री उशिरा इराण आणि इस्रायलमधील संघर्षादरम्यान सुरू असलेले स्थलांतर ऑपरेशन दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्याने रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले होते.