
मुंबई नाशिक महामार्गवरील जुन्या कसारा घाटात बुधवारी मध्य रात्रीच्या सुमारास घाटातील एका वळणावर ट्रेलर ट्रक बंद पडला होता. याच दरम्यान पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास एक महाकाय कंटेनर नाशिक दिशेने कडे जात असताना पुढे बंद पडलेल्या ट्रेलर वर जाऊन आदळला आणि मागून धडकलेला कंटेनर महामार्गांवर आडवा झाला.
महामार्गांवर कंटेनर आडवा झाल्याने नाशिककडे जाणारा मार्ग पूर्ण बंद झाला. त्यामुळे मुंबई हुन नाशिक कडे जाणारी वाहने कसारा घाटात तब्बल 6 तास अडकून पडली होती. या आपघाता मुळे नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाल्याने पहाटे पाच वाजेपर्यंत पासून कसारा घाटातील अडकलेल्या वाहनाच्या 4 किलोमीटर पर्यत रांगा लागल्या होत्या.

























































