
आजच्या बदललेल्या युद्धनीतीत एअर डिफेन्स सिस्टम कोणत्याही देशाच्या सुरक्षेचा महत्त्वाचा हिस्सा बनला आहे. रशियाचे एस-400 ही जगातील सर्वाधिक चर्चेत असलेली एअर डिफेन्स यंत्रणा आहे. त्यानंतर रशिया आता अधिक प्रगत आणि घातक एस- 500 प्रोमेटरी एअर डिफेन्स यंत्रणा विकसित करत आहे. एस-500 ही एस-400पेक्षा घातक आहे. हिंदुस्थानला त्याची गरज आहे. ‘एस-500’ हवाई संरक्षक प्रणाली ही ‘एस-400’पेक्षा अधिक प्रगत मानली जाते. ती हायपरसोनिक क्षेपणास्त्रांना रोखू शकते. ‘एस-500’ केवळ लढाऊ विमाने आणि क्रूझ मिसाईल्सला थांबवत नाही तर इंटरकॉन्टिनल बॅलेस्टिक मिसाईल आणि खालील पृथ्वीच्या कक्षेत असलेले सॅटेलाईटही मारण्यास सक्षम आहे. यामध्ये अत्याधुनिक रडार, मल्टीलेटर ट्रपिंग सिस्टीम, अॅडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेयर सपोर्ट सिस्टीम आहे.
हिंदुस्थानचे शेजारी राष्ट्र असलेल्या चीन आणि पाकिस्तानकडे आण्विक सामर्थ्य आहे. उभय देशांमध्ये सैन्य सहकार्य वाढत आहे. चीनने आधीच हायपरसोनिक मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये आघाडी घेतली आहे.
























































