
भारतीय हवाई दलाने अग्निवीर वायुभरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठीचे अर्ज 11 जुलैपासून सुरू होणार असून एकूण 2500 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. अग्निवीर वायूचा कार्यकाळ केवळ चार वर्षांचा आहे. या भरतीमध्ये सेवा निधी योजनेनुसार जवळपास 10.08 लाख रुपये अग्निवीरांना मिळतील. ही भरती अविवाहित महिला- पुरुषांसाठी आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती agnipathvayu.cdac.in वर देण्यात आली आहे.
























































