
संतांच्या पालख्या पंढरपुराकडे रवाना झाल्या आहेत. तमाम वारकरी पांडुरंग भेटीसाठी पंढरपुराकडे पायी वारी करीत निघाले आहेत. पांडुरंगाचे दर्शन घेण्याची आस मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांनादेखील लागली आहे. डबेवाला कामगार मुंबईत जरी काम करत असला तरी त्याची वारी कधी चुकली नाही. वारीला जाण्यासाठी डबेवाला कामगारांनी एक दिवसाची रजा जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवार, 7 जुलैला डबेसेवा बंद असणार आहे, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनने दिली.