
हिंदुस्थानी थाळी ही भाज्यांशिवाय अपूर्ण असते. अनेकदा असे घडते की घरातील हिरव्या भाज्या संपतात. अशा परिस्थितीत लोणचे खाल्ले जाते किंवा चटणी बनवण्याचा एकमेव पर्याय उरतो. मात्र भाजीशिवायही देखील ही भाजी बनवता येते. तर तुम्हाला भाज्यांशिवाय बनवलेल्या या भाजीबद्दल जाणून आश्चर्य वाटेल.आपण ज्या भाजी बद्दल बोलत आहोत ती म्हणजे शेव भाजी. ही भाजी लवकर बनवू शकतो आणि खाऊ शकतो. चला त्याची सोपी आणि झटपट रेसिपी पाहूया.
साहित्य
– एक कप शेव
– टोमॅटो
– मोहरी, जीरे
– कढीपत्ता किंवा तमालपत्र
– लाल तिखट
– धणे पावडर
– तेल आणि चवीनुसार मीठ
कृती-
सर्वप्रथम, पॅनमध्ये एक चमचा तेल घाला. तुम्हाला वेगळी चव हवी असेल तर तुम्ही ते देशी तूप देखील घालू शकता.
तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे घाला आणि ते तडतडल्या नंतर मोहरी तडतडून घ्या. त्यानंतर कढीपत्ता घाला. हिरवी मिरची चिरून घाला. आणि त्यात आलं पेस्ट घाला. हे सर्व चांगले परतून घ्या. यानंतर, सर्व मसाले एक एक करून घाला, टोमॅटो बारीक चिरून त्यात घाला.
२ टोमॅटो पुरेसे असतील. जेव्हा सर्व गोष्टी शिजतील आणि ग्रेव्ही तयार होईल तेव्हा गरजेनुसार थोडे पाणी घाला आणि ते शिजू द्या. तेल मसाल्यांपासून वेगळे झाल्यावर, शेव घाला आणि मिक्स करा. अशा प्रकारे तुमची गरम शेवची भाजी तयार होईल.
तुम्ही ही शेवची भाजी रोटी-पराठ्यासोबत खाऊ शकता. याशिवाय, तुम्ही पावसोबत सर्व्ह करू शकता आणि या भाजीचे भातसोबत मिश्रण देखील खूप छान लागते. अशा प्रकारे, जर तुमच्या घरात भाज्या नसतील किंवा तुम्ही एकटे असाल आणि तुम्हाला काहीतरी लवकर शिजवून खायचे असेल तर तुम्ही शेवची भाजी वापरून पाहू शकता.




























































