चलो वरळी! वाजतगाजत, गुलाल उधळत या! आम्ही वाट बघतोय!! शनिवारी डोममध्ये होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंचे आवाहन

हिंदी सक्तीविरोधातील मराठी माणसाचा एल्गार यशस्वी झाला. त्याचा विजयोत्सव 5 जुलैला वरळीच्या एनएससीआय डोममध्ये साजरा होणार आहे. शिवसेना आणि मनसेचे नेते त्याच्या नियोजनासाठी व्यस्त आहेत. तो केवळ विजयोत्सव नसेल तर मराठी माणसाच्या एकजुटीचे विराट दर्शन असणार आहे. मराठी माणसाचा आवाज त्यात शतपटीने घुमणार आहे. 5 तारखेला वाजतगाजत, गुलाल उधळत या… आम्ही वाट बघतोय… असे निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्रितरित्या सर्व मराठीजनांना दिले आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज एका संयुक्त पत्रकाच्या माध्यमातून हे निमंत्रण आहे. आवाज मराठीचा…असे विजयोत्सवाचे शीर्षक आहे. ‘‘मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…, कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं… आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजतगाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या… आम्ही वाट बघतोय…’’ असा मजकूर त्यात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्याही स्वाक्षऱया या निमंत्रणावर आहेत.

वरळी डोम येथे 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता या विजयी मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या मेळाव्यात ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहेत. याशिवाय 29 जूनला झालेल्या आंदोलनात सहभागी झालेले सर्व समविचारी पक्ष आणि संघटनांचे नेते व पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. विजयोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून शिवसेना आणि मनसे नेत्यांनी आज वरळी डोम येथे जाऊन पाहणीही केली.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज एका संयुक्त पत्रकाच्या माध्यमातून हे निमंत्रण दिले आहे. आवाज मराठीचा…असे विजयोत्सवाचे शीर्षक आहे. ‘‘मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…, कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं… आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजतगाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या… आम्ही वाट बघतोय…’’ असा मजकूर त्यात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्याही स्वाक्षऱया या निमंत्रणावर आहेत.

वरळी डोम येथे 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता या विजयी मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या मेळाव्यात ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहेत. याशिवाय 29 जूनला झालेल्या आंदोलनात सहभागी झालेले सर्व समविचारी पक्ष आणि संघटनांचे नेते व पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. विजयोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून शिवसेना आणि मनसे नेत्यांनी आज वरळी डोम येथे जाऊन पाहणीही केली.