
गुजरात उच्च न्यायालयात मंगळवारी एका ऑनलाईन सुनावणी दरम्यान चक्क ज्येष्ठ वकील बिअर पित होते. भास्कर तन्ना असे त्या वकिलाचे नाव असून त्यांना याप्रकरणी न्यायालयाने सु मोटू दखल घेत रजिस्ट्रीला या प्रकरणाचा तपास करत तन्ना त्याचा अहवाल न्यायालयात सादर करायला सांगितला आहे. तसेच या प्रकरासाठी तन्ना यांना दिले गेलेले ‘वरिष्ठ वकील’ हे पद काढून घेतले पाहिजे असे देखील न्यायालयाने सुनावले आहे.
25 जून रोजी न्यायमूर्ती संदीप भट्ट यांच्या कोर्टात एका केसची ऑनलाईन सुनावणी सुरू होती. त्यावेळी ज्येष्ठ वकील भास्कर तन्ना हे बिअर पिताना दिसले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
त्यानंतर या घटनेची न्यायमूर्ती एएस सुपेहिआ आणि न्यायमूर्ती आर टी वाच्छानी यांच्या खंडपिठाने सु मोटू दखल घेत भास्कर तन्ना यांना शिक्षा ठोठावली आहे. ”भास्कर तन्ना हे नुकत्याच एका ऑनलाईन सुनावणीदरम्यान बिअर पित होते. तसेच अनेकदा त्यांनी मोबाईल फोनचा देखील वापर केला. त्यांचे हे वागणे अपमानास्पद आहे’, असे न्यायमूर्ती एएस सुपेहिआ यांनी सांगितले.