
बग्लेरियन भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांची भाकीतं नेहमीच चर्चेत असतात. त्यांची अनेक भाकीतं खरी ठरल्याचा दावा करण्यात येतो. आता बाबा वेंगा यांनी 2025 या वर्षाबाबतही महत्त्वाची भाकीतं केली असून हे वर्ष जगाच्या अंताची सुरुवात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी वर्तवलेल्या भाकीताप्रमाणे या वर्षात जगातील अनेक देशात युद्धप्रसंग ओढवले आहेत. आता जुलै महिन्याबाबतही त्यांनी केलेल्या भाकीताने जगाला धडकी भरली आहे.
बाबा वेंगा यांनी वर्तवलेली भाकीतानुसार जुलै महिन्यात जगावर एक महासंकट येणार आहे, यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. बाबा वेंगा यांच्या बूक ‘ दी फ्यूचर’ मध्ये याबाबतचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या भाकीताप्रमाणे जुलै महिन्यात महाप्रलय येणार आहे. त्यामुळे जैुल महिन्यात अनेक मोठे बदल होतील. हे सर्व बदल वातावरण, आजार आणि जागतिक राजकारणाशी संबंधित असू शकतात असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.
जुलै महिन्यात जपानवर महासंकट येणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. जपानमध्ये त्सुनामी येईल यामुळे समुद्रात तीन पट अधिक उंचीच्या लाटा उसळतील. त्यात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांनी तर आपलं हॉटेल आणि विमान तिकीट बुकिंग देखील रद्द केलं आहे.




























































