आयएनएस युद्धनौका ‘तमाल’ नौदलात

हिंदुस्थानी नौदलाला आणखी एक युद्धनौका आयएनएस तमाल (एफ071) मिळाली. रशियातील कलिनिनग्राद येथील यंतर शिपयार्डमध्ये बनवलेली नवीन स्टील्थ मल्टी रोल फ्रिगेट युद्धनौका तमाल अधिकृतपणे हिंदुस्थानी नौदलात दाखल झाली आहे. या युद्धनौकेला हिंदुस्थान आणि रशियाने संयुक्तपणे तयार केले आहे. तमालला लांब पल्ल्यासाठी बनवण्यात आलेय. यात व्हर्टिकल लाँच सरफेस टू एअर मिसाईल, आधुनिक 100 मिमी गन, अँटी सबमरीन रॉकेट्स, उच्च फायर कंट्रोल व सर्विलान्स रडार लावले आहेत.