
जूनमध्ये सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांचा पाच दिवसांचा विदेश दौरा करून हिंदुस्थानात परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा विदेश दौऱयावर रवाना झाले आहेत. या वेळी मोदी पाच देशांच्या दौऱयावर गेले आहेत. मोदी यांचा हा विदेश दौरा 8 दिवसांचा असून ते या दौऱयात घाना, त्रिनिदाद, टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांना भेटी देणार आहेत. 2014 ला पंतप्रधान झाल्यापासून मोदींचे विदेश दौरे सुरूच आहेत. जगातील अनेक देशांना मोदींनी भेटी दिल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत मोदींनी एकूण 38 विदेश दौरे केले आहेत.
2024 मध्ये दौऱ्यावर आलेला खर्च
- यूएई – 5,31,95,485 रु.
- कतार – 3,14,30,27,271 रु.
- भूतान – 4,50,27,271 रु.
- इटली – 4,36,55,289 रु.
- ऑस्ट्रेया – 4,35,35,765 रु.
- रशिया – 5,34,71,726 रु.
- पोलँड – 10,10,18,686 रु.
- ब्रूनेई – 5,02,47,410 रु.
- अमेरिका – 15,33,76,348 रु.
- सिंगापूर – 7,75,21,329 रु.
- लाओ – 3,00,73,096 रु.
- रशिया – 10,74,99,171 रु.
- नायजेरिया – 4,46,09,640 रु.
- ब्राझील – 5,51,86,592 रु.
- गुयाना – 5,45,91,495 रु.