पंजाब नॅशनल बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)ने आपल्या खातेदारांना एक आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने आता बचत खातेधारकांना मिनिमम बँक बॅलन्स ठेवण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. ज्या खातेदारांचे मिनिमम बॅलन्स नसेल, त्या खातेदारांना कोणताही दंड द्यावा लागणार नाही. त्यामुळे लाखो बँक खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.