
मुस्लिमबहुल कझाकिस्तानने सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणारा पेहराव करण्यावर बंदी घातली आहे. त्याचा थेट परिणाम मुस्लिम महिलांच्या पेहरावावर होणार असून त्यांना नकाब घालता येणार नाही.
कझाकिस्तानच्या संसदेने यासंदर्भातील कायद्यात सुधारणा केली आहे. वाढता धार्मिक कट्टरतावाद व त्यामुळे निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. सुधारित कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यात बाधा आणणारे कपडे सार्वजनिक ठिकाणी घालता येणार नाहीत. या नियमाला केवळ वैद्यकीय अडचण, नैसर्गिक आपत्ती आणि क्रीडा व सांस्पृतिक कार्यक्रमांचा अपवाद असेल. विशेष म्हणजे कायद्याच्या मसुद्यात धर्माचा किंवा धार्मिक पेहरावाचा पुठेही स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला नाही. कझाकिस्तानचे अध्यक्ष कासीम जोमार्ट टोकायेव्ह यांनी या कायद्यास नुकतीच मंजुरी दिली.