Marathi School In America – अमेरिकेत मराठी शाळा

मराठी भाषेचा वारसा आपल्याला टिकवून ठेवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्या व्हायरल होत असलेला एक सुंदर व्हिडीओ. हा व्हिडीओ आहे अमेरिकेतील एका मराठी शाळेचा. होय, सातासमुद्रापार अमेरिकेत चक्क मराठी शाळा सुरू झाली आहे. शार्लट मराठी शाळा असे या शाळेचे नाव आहे. व्हायरल व्हिडीओत वयोवृद्ध माणसे, पालक शाळेचा फेरफटका मारताना दिसताहेत. तसेच व्हिडीओमध्ये इयत्ता पहिलीची मराठी पुस्तके, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक अशा अनेक गोष्टी दिसतायत. इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओला तब्बल 60 लाखांहून अधिक ह्यूज आहेत. आपल्याकडे मराठी शाळा बंद पडत असताना अमेरिकेत मराठी शाळा सुरू होते हा सुखद धक्का असल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.