कपड्यावर डाग पडले तर… हे करून पहा

जेवत असताना किंवा नकळतपणे अनेकदा कपड्यावर डाग पडतात. डाग पडू नये याची सर्वात आधी काळजी घेणे गरजेचे आहे, परंतु चुकून जर कपड्यावर डाग पडला असेल तर यासाठी घरगुती उपाय आहेत. गरम पाणी फक्त तेल किंवा हळदीच्या डागांसाठी वापरा. कपड्यावर रक्त किंवा दुधाचा डाग पडला असेल तर त्यासाठी थंड पाणी वापरा.

ज्या कपड्यावर रक्ताचा डाग पडला आहे, त्याला थंड पाण्यात लगेच भिजवा. नंतर साबण आणि थोडे मीठ लावून घासून धुवा. चहा-कॅफीच्या डागावर लगेच थोडंसं थंड पाणी ओता. हळदीचा डाग पडला असेल तर लगेच लिंबाचा रस लावा आणि उन्हात ठेवा 15 ते 20 मिनिटे त्याला सुकवा. डाग नाहीसा होईल.