
खर्च परवडत नसल्यामुळे नऊ वर्षांपूर्वी बैल विपून खांद्यावर जू घेतलेल्या हडोळती येथील अंबादास आणि मुक्ताबाई पवार या दांपत्याची परवड पाहून अवघा महाराष्ट्र हळहळला. रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने पवार दांपत्याच्या खांद्यावरील जू नऊ वर्षांनंतर खाली उतरवले. या संघटनेने पवार दांपत्याला शेतीकामासाठी बैलजोडी भेट म्हणून दिली आहे.
हडोळती येथील अंबादास पवार यांचा खांद्यावर जू घेऊन कोळपणी करतानाचा पह्टो ‘सामना’त प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारने वाऱ्यवर सोडलेल्या पवार दांपत्याला मदत करण्यासाठी समाजातून अनेक हात पुढे आले. यामधे आज रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने अंबादास पवार यांना शेतीकामासाठी बैलजोडी भेट म्हणून दिली.