
सातारा तालुक्यातील 197 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे फेर आरक्षण शुक्रवारी (दि. 4) सातारा पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात आले. यामध्ये एप्रिल महिन्यात काढण्यात आलेली अनेक ठिकाणची आरक्षणे बदलली. या सोडत प्रक्रियेत गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा हिरमोड झाला, तर काहींना लॉटरी लागली आहे. ओपनच्या ठिकाणी राखीव पडल्याने अनेकांची संधी हुकली असून, बहुतांश ठिकाणी पत्नीच्या रूपाने सरपंचपदाची निकडणूक लढवण्याची संधी तयार झाली आहे.
प्रांताधिकारी आशीष बारकूल, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, निवासी नायब तहसीलदार सुजाता पाटील, निवडणूक नायब तहसीलदार युवराज गायककाड यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली.
सातारा तालुक्यात 197 ग्रामपंचायती आहेत. त्यातील डोळेगाव, चिंचणेर निंब, लिंबाचीकाडी, पाडळी, रेणाकळे, पोगरकाडी, कर्णे, संभाजीनगर, रामनगर, अंगापूर तर्फे तारगाव, कासोळे येथे अनुसूचित जाती महिला, तर आरगडकाडी, सारखळ, खोजेकाडी, टिटकेकाडी, गकडी, कामेरी, आष्टे नंबर 1, कुशी, गणेशवाडी, सोनकडी, ठोसेघर अनु. जाती खुले आरक्षण पडून ही गावे राखीव झाली आहेत. तर, आरळेत अनुसूचित जमाती महिला आरक्षण पडले आहे.
दरे बुद्रूक, कर्ये, गजकडी, कातकडी बु., लिंब, कोपर्डे, लांडेकाडी, काळोशी, धनकडेकाडी, नांदगाव, पानमळेकाडी, बोरणे, भाटमरळी, गोके गावांत ओबीसी महिला आरक्षण पडले असून, केणेखोल, क्षेत्रमाहुली, नुने, खिंडकाडी, तुकाईचीवाडी, गोजेगाव, सैदापूर, मालगाव, मर्डे, उफळी, किडगाव, कारी, जोतिबाची वाडीत ओबीसी खुले आरक्षण पडले आहे.
सर्वसाधारण महिलासाठी आंबकडे खु., बोपोशी, केळे, बोरगाव, कासारस्थळ, शेंद्रे, संगममाहूली, आसनगाव, मत्यापूर, निगडीतर्फे सातारा, फडतरकाडी, सायळी पुनर्वसन, नागेकाडी, निसराळे, फत्यापूर, साबळेकाडी, परळी, पिलाणी, सोनापूर, सासपडे, कण्हेर, काकदरे, अटाळी साकली, चिंचणी, परमाळे, पांगारे, यवतेश्वर, जाधववाडी, रामकृष्णनगर, कुसवडे, कडगाव, नेले, जांभळेवाडी, इंगळेवाडी, कुसबुद्रूक, चाळकेवाडी, देककल पारंबे, समर्थनगर, जाकळवाडी, काढे, कामथी तर्फे सातारा, आकाडवाडी, अपशिंगे, जांभे, दरे तर्फे परळी, नित्रळ, रोहोट, चोरगेवाडी, राकुसलेवाडी, चिंचणेर कंदन, आंबेवाडी, आकले, करंडी, धाकडशी, शहापूर, कळंबे, जैतापूर, बसाप्पाचीवाडी, डबेवाडी, माळ्याचीवाडी, खडगाव आरक्षित झाली आहेत.
सोनगाव सं. निंब, जिहे, काशिळ, जकातवाडी, केचले, सोनगाव तर्फ सातारा, मांडके, कळसे, खाकली, राजापुरी, शेळकेवाडी, आलकडी, धाकली, बेंडवाडी, सायळी, पाटेघर, महागाव, नागठाणे, खेड, आरफळ म्हसके, आसगाव, माजगाव, बनघर, कुमठे, शिंदेवाडी, कौंदनी, नरेवाडी, धनगरवाडी (निगडी), भरतगाव, आंबकडे बुद्रूक, कोंढकली, जरेवाडी, निगुडमाळ, यादकवाडी, सांबरवाडी, मुग्दुलभटाचीवाडी (शिकाजीनगर), आगुंडेवाडी, देगाव, पाटखळ, न्हाळेवाडी, किजयनगर, बोरखळ, करंजे तर्फ परळी, पाटेश्वरनगर, भरतगाववाडी, कुसखुर्द, कुरुलबाजी, कुरण, रेकंडे, मोरेवाडी, कडूथ, शिकथर, समर्थगाव, लुमणेखोल, अंगापूर कंदन, पिंपळवाडी शेरेवाडी, भोंदाकडे, कारंडवाडी, चिखली, धनगरवाडी (कोडोली) ही गाके खुली झाल्याने निकडणुकीत चुरस होणार आहे.