कोकण, घाटमाथ्याला पाऊस झोडपणार

जुलैच्या सुरुवातीपासून सक्रिय झालेला पाऊस पुढील दोन-तीन दिवस राज्याच्या बहुतांश भागांमध्ये धुमाकूळ घालणार आहे. विशेषतः कोकण व घाटमाथ्यावरील जिह्यांमध्ये अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ठाणे, पालघरसह आठ जिह्यांना सतर्पतेचा इशारा दिला आहे. मुंबईतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवून ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

n विदर्भ आणि मराठवाडय़ातील जिह्यांनाही हवामान खात्याने सतर्पतेचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोलीत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.