
>> गणेश पुराणिक
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबईकरांना रेल्वे वाहतुकीच्या खोळंब्यामुळे मोठा फटका बसला आहे. पनवेल – सीएसएमटी मार्गावरील अप-डाऊन दिशेने सुरू असलेली वाहतूक उशिराने सुरू आहे. यामुळे रेल्वे स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली असून चाकरमान्यांना आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यास उशीर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेरूळ स्थानकाजवळ रविवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास रेल्वेचे एक मशीन घसरले होते. त्याचे काम सोमवारी सकाळपर्यंत सुरू होते. त्यामुळे सायंकाळी घरी निघालेल्या नागरिकांना त्रास झाला. नागरिकांनी रेल्वे रुळावरून चालत जावून स्थानकं गाठली. दरम्यान, या काळात पनवेल-नेरूळ-वाशी अशा विशेष बस चालवण्यात आल्या होत्या.
दरम्यान, थोड्या वेळापूर्वी मानखुर्द रेल्वे स्टेशनवर लोकल सुरू झाल्याची उद्घोषणा होत आहे. पनवेल येथून 6 वाजून 2 मिनिटांनी एक लोकल सीएसएमटीच्या दिशेने मार्गस्थ झाली. तत्पूर्वी वाशी येथून वडाळा स्थानकापर्यंत जाणारी लोकल सोडण्यात आली. मानखुर्दला 6 वाजून 13 मिनिटांनी येणारी ही लोकल साधारण अर्धा तास उशिराने आली. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती.
पनवेल-सीएसएमटी दरम्यान अप-डाऊन मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. #CentralRailway pic.twitter.com/a7yaBe2Iax
— Saamana Online (@SaamanaOnline) July 7, 2025
लोकलसेवेचा बोजवारा उडाल्याने सकाळच्या सुमारास कार्यालयीन कामकाजाला निघालेली चाकरमानी विविध स्थानकांवर अडकली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लेटमार्क लागणार म्हणून प्रवाशांना मनस्ताप होत आहे. अनेकांनी मिळेल ते साधन एसटी, बेस्ट, टॅक्सी, रिक्षा पकडून इच्छित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला.