परपुरुषासोबत व्हिडीओ कॉलवर अश्लील चाळे करणाऱ्या महिलेला अडवले, पतीसह मुलीला मारहाण करणाऱ्या महिलेवर गुन्हा

परपुरुषांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलण्यास हटकल्याच्या रागातून माथेफिरू महिलेने पतीसह अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत मुलीच्या डोक्याला, छातीला आणि पाठीला दुखापत झाली आहे. याप्रकरणी पतीसह मुलीच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

माथेफिरू महिला ही पती तीन मुली आणि एका मुलासह मुंब्रा येथे राहते. मात्र 2019 पासून ती सोशल मीडियाच्या आहारी गेली. ती परपुरुषांसोबत व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे करत असल्याने तिला तिच्या पतीने अनेकवेळा हटकले आणि त्यावरून अनेकदा त्यांच्यात वाद झाला होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी तिला तिचा पती व अल्पवयीन मुलीने आक्षेपार्ह स्थितीत व्हिडीओ कॉल वर बोलताना पहिले. यावर त्यांनी तिला हटकले असता संतापलेल्या महिलेने दोघांना शिवीगाळ करत लाकडी स्टुल व लोखंडी झाऱ्याने बेदम मारहाण केली. तसेच त्यांचे मोबाईल फोडून महत्त्वाची कागदपत्रेही फाडून फेकून दिली.