ट्रेंड – लग्नपत्रिका की व्हॉट्सअॅप चॅट…

आपला लग्नसोहळा संस्मरणीय व्हावा, असे सगळ्यांना वाटते. म्हणूनच काहीतरी वेगळे करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. लग्नपत्रिका वेगळी असावी म्हणून काही जण भन्नाट शक्कल लढवतात. अशीच एक हटके लग्नपत्रिका सध्या व्हायरल होत आहे. ती पाहून आपण हातात लग्नाची पत्रिका नाही तर फोन धरला आहे आणि व्हॉट्सअॅप बघत आहोत, असेच वाटते. याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओत असे दिसतंय की, लग्नाचे कार्ड बनवले आहे आणि ते पण हुबेहुब स्मार्टफोनच्या आकाराचे. या कार्डाला लाल रिबन बांधली आहे. रिबीन उघडल्यावर मोबाईल क्रीन दिसते. त्यावर वेळ लिहिलेली आहे. दोन मुलींचे ऍनिमेटेड चित्र आहे. कार्ड उघडल्यावर आतमध्ये वधूवराचे नाव, लग्नाची तारीख आणि इतर माहिती व्हॉट्सअॅप चॅटच्या स्टाईलमध्ये लिहिली आहे. कार्डच्या उजव्या बाजूला गुगल मॅप आहे.