हिंदीत बोलेन, भोजपुरी बोलेन पण मराठीत बोलणार नाही… विरारच्या परप्रांतीय रिक्षा चालकाची मुजोर

मराठी भाषेत बोलण्यावरून परप्रांतीयांची मुजोरी वाढत चालली आहे. विरारमध्ये एका मुजोर परप्रांतियाचे हिंदीत बोलण्यावरून मराठी व्यक्तीसोबत वाद झाला. त्यानंतर या मुजोर रिक्षा चालकाने थेट मी हिंदीत बोलेन, भोजपुरीत बोलेन पण मराठीत बोलणार नाही असे मुजोरपणे सांगितले. त्याच्या या मुजोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो रिक्षा चालक मराठी व्यक्तीला शिवीगाळ करताना देखील दिसत आहे.