
महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतांची चोरी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे बिहारमध्येही मते चोरण्याचा निवडणूक आयोगाचा डाव आहे. हा गरीबांची मते हिसकावण्याचा प्रकार आहे. हे बिहार आहे आणि बिहारमधील जनता हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला इशारा दिला.
इंडिया आघाडीच्या वतीने मतदार याद्यांच्या फेरतपासणीविरोधात बिहार बंदची हाक दिली होती. त्यावेळी निघालेल्या मोर्चात राहुल गांधी बोलत होते. निवडणूक आयोगाला जे करायचे आहे ते त्यांनी करावे, परंतु, नंतर कायदा तुमच्यावर लागू होईल. कितीही मोठय़ा पदावर असाल, कायदा तुम्हाला सोडणार नाही असे ते म्हणाले.