
राज्य स्तरीय टेनिस खेळाडू राधिका यादव हिची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. वडिलांनीच मुलीवर तीन गोळ्या झाडल्याच प्राथमिक तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलं आहे.
हरयाणा राज्यातील गुरुग्राममधील सुशांत लोक फेस-2 परिसरातील राधिका यादवच्या राहत्या घरामध्ये ही घटना घडली आहे. दुपारी 12 च्या दरम्यान आरोपी वडिलांनी राधिकावर तीन गोळ्या झाडल्या. रिल बनवण्यावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. तिला तात्काळ रुग्णालायत दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. गुरुग्राम पोलिसांनी तात्काळ आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्याकडून बंदूक जप्त केली आहे. या घटनेमुळे गुरुग्राम जिल्हा हादरून गेला आहे. राधिका ही एक राज्य स्तरिय टेनिस खेळाडू होती. अनेक स्पर्धांमध्ये तिने दमदार कामगिरी करत विजय संपादित केला होता. NDTV ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.