इंटरनेट स्पीडमध्ये जपानचा जागतिक विक्रम

वेगवान इंटरनेटमध्ये जपानने जागतिक विक्रम रचला आहे. जपानने प्रति सेपंद 10.20 लाख गिगाबिट इंटरनेट स्पीड मिळवला आहे. या वेगवान स्पीडमुळे अवघ्या काही सेकंदात संपूर्ण नेटफ्लिक्स लायब्ररी किंवा 10 हजार 4के चित्रपट डाऊनलोड होऊ शकतात. हा वेग हिंदुस्थानच्या सरासरी इंटरनेट स्पीडच्या तुनलेत 63.55 एमबीपीएसपेक्षा जवळपास 1.6 कोटी पट जास्त आहे. तर अमेरिकन इंटरनेट स्पीडपेक्षा 35 लाख पट जास्त आहे. जपानने 2024 मध्ये 402 टेराबिट प्रति सेकंद (टीबीपीएस) 50,250 गिगाबिट प्रति सेकंद वेग गाठला होता.