
सातत्याने वीजपुरवठा खंडित होणे, अदानी कंपनीच्या मीटरसाठी सक्ती यामुळे नागरिक त्रस्त झाले असून महावितरणचा गलथान कारभार समोर आला आहे. मात्र नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा जाब विचारण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. संतापलेल्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्यानंतर वठणीवर आलेल्या अधिकाऱ्यांनी 30 जुलैपर्यंत सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
उरण परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित याबाबत होण्याच्या घटना वाढल्या असून ग्राहकांना अदानी ग्राहकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख मनोहर भोईर व उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. कोटनाका येथील राघोबा मंदिरापासून सुरू झालेला हा मोर्चा थेट महावितरणच्या कार्यालयावर धडकला.
यावेळी संतप्त शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत समस्यांचा पाढा वाचला. दट्टया दिल्यानंतर अधिकाऱ्यांची तंतरली. या सर्व समस्यांचे निरसन करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने आंदोलन मागे रुपेश पाटील, माजी सभापती भास्कर मोकल, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, रोहिदास पाटील, दीपक भोईर, महेश वर्तक, संतोष ठाकूर, जयवंत पाटील, विनोद म्हात्रे, संदीप जाधव, सुजाता पाटील, मेघा मेस्त्री, वीणा तलरेजा, रंजना तांडेल, प्रणिता म्हात्रे आदी उपस्थित होते.
नुकताच पतभार स्विकारला आहे. शिवसैनिकांनी केलेल्या सूचना आणि नागरिकांना होणाऱ्या समस्यांची माहिती घेऊन त्या सर्व समस्यांचें निरसन 30 जुलैपर्यंत करण्यात येतील.
विकास गायकवाड, उपअभियंता, महावितरण