
हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने आपल्या आगामी गगनयान मिशनसाठी सर्विस मॉडय़ुल प्रोपल्शन सिस्टम (एसएमपीएस) चे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. यासोबतच या सिस्टमची आवश्यक चाचणीसुद्धा पूर्ण केली आहे, अशी माहिती इस्रोने शनिवारी दिलीय. शुक्रवारी सिस्टमचे 350 सेपंद म्हणजेच जवळपास 6 मिनिटांपर्यंत मोठी चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा उद्देश म्हणजे जर उड्डाणावेळी काही गडबड झाली आणि मिशनला अर्ध्यात रोखण्याची वेळ आली तर ही सिस्टम योग्यरित्या काम करेल की नाही, हे तपासणे होय.
गगनयान मिशन हिंदुस्थानचे पहिले मानव अंतराळ मिशन आहे. यावर सध्या इस्रोकडून काम केले जात आहे. या चाचणीवेळी प्रोपल्शन सिस्टमचे प्रदर्शन अनुमानानुसार, सामान्य राहिले असे इस्रोने म्हटले. गगनयानच्या सर्विस मॉडय़ुलमध्ये एक खास सिस्टम लावण्यात आले आहे. जे दोन प्रकारच्या इंधनावर चालते. ही सिस्टम त्या भागाला मदत करते जे मानवाला घेऊन अंतराळात जाते. याचे काम रॉकेट कक्षा म्हणजेच ऑर्बिटमध्ये पोहोचवणे होय. उड्डाणावेळी दिशाला नियंत्रित करणे, गरज पडल्यास रॉकेटचा वेग कमी करणे, जर कोणतीही गडबड जाणवत असेल तर मिशनला अर्ध्यावर सोडून अंतराळ प्रवाशांना सुरक्षित परत आणणे होय. या सिस्टममध्ये दोन इंजिन काम करते. लिक्विड एपोजी मोटर रॉकेटला योग्य कक्षेत घेऊन जाणे आणि हळूहळू खाली आणण्यात मदत करणे होय. एसएमपीएसला योग्यरित्या ओळखण्यासाठी एक मॉडल तयार करण्यात आले आहे. याला सिस्टम डेमोंस्ट्रेशन मॉडल म्हटले जाते.
चार तास चालली चाचणी
या मॉडलवर इस्रोने 25 वेळा वेगवेगळ्या चाचण्या केल्या. या सर्व चाचण्या एकूण 14,331 सेपंद म्हणजेच 4 तासांपर्यंत चालली. याचा उद्देश हा होता की, ही सिस्टम गगनयान मिशनसाठी वेगवेगळ्या टप्प्यात आणि व्यक्तीला सुरक्षित घेऊन जाण्यात यशस्वी ठरते की नाही.