कुलरमधून घाण वास येतोय? मग ‘हे’ करून पहा

कूलरचा जास्त वापर केल्यानंतर काही काळाने कूलरमधून दुर्गंधी येऊ लागते. दुर्गंधीमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. हा वास बहुतेकदा बुरशी, बॅक्टेरिया आणि कूलरमध्ये बराच काळ साठवलेल्या पाण्यामुळे होतो. अशावेळी काही घरगुती आणि स्वस्त उपाय करून कूलरमधून येणारा घाण वास दूर करता येतो.

एक चमचा गुलाबजलात आणि कापराचे एक दोन तुकडे टाका. हलका सुगंध येईल. कूलरच्या टाकीत थोडा लिंबाचा रस टाका. थोडं पाणी टाका. कडुलिंबाच्या पानांचाही वापर करता येतो. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा नैसर्गिक क्लिनर म्हणून काम करतात. दर आठवड्याला कूलरची टाकी स्वच्छ करा.