
आपल्या अंदाधुंद फलंदाजीमुळे ‘आयपीएल’मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा करिश्मा आता इंग्लंड दौऱयरावर बघायला मिळत आहे. हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघात खेळणाऱ्या या बिहारच्या फलंदाजाने युवा एकदिवसीय क्रिकेट मालिकेत 300हून अधिक धावांची लयलूट केली आहे. आता सुरू असलेल्या युवा कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात तो फलंदाजीत ‘नापास’ झाला, पण त्याने गोलंदाजीत त्याची भरपाई करीत एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातलीय. पहिल्या युवा कसोटी सामन्यात हिंदुस्थानने पहिल्या डावात 540 धावा फटकावल्या. यात कर्णधार आयुष म्हात्रे (102) शतक, तर विहान मल्होत्रा (67), अभिग्यान कंडू (90), राहुल कुमार (85) व आर. एस. अब्रिश (70) यांनी अर्धशतके झळकवली. मात्र, यात वैभव सूर्यवंशीला केवळ 14 धावा करता आल्या.