मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने

मुंबईत सकाळपासून सुरु झालेल्या पावसाच्या संततधारेमुळे आता लोकल सेवेवरही परीणाम झालेला आहे. परीणामी मध्य रेल्वेची वाहतूक ही 15 ते 20 मिनिटे विलंबाने सुरु आहे. मुंबईमध्ये येत्या दोन ते तीन तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये त्यासोबत मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.