उत्पादन शुल्क वाढीबद्दल चिंता

प्रीमियम भारतीय मद्य उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंटरनॅशनल स्पिरिट्स अ‍ॅण्ड वाईन असोसिएशन ऑफ इंडिया (आयएसडब्ल्यूएआय) या संस्थेने राज्य सरकारने भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावर उत्पादन शुल्कात केलेल्या तीव्र वाढीच्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या निर्णयामुळे दूरगामी आर्थिक व सामाजिक परिणाम भोगावे लागू शकतात, अशी भीती उद्योगतज्ञांनी व्यक्त केली आहे. अलीकडील दरवाढीमुळे राज्य सरकारच्या महसूल संकलनाच्या उद्दिष्टांवर परिणाम होऊ शकतो. कारण बेकायदेशीर व्यापार जाळय़ाचा विस्तार होण्याची आणि नियमभंगाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, असा इशारा ‘आयएसडब्ल्यूएआय’ने दिला आहे.