
दिंडोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर गुरुवारी मध्यरात्री कार व दुचाकीची धडक होऊन भीषण अपघात झाला. यानंतर दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या नाल्यात उलटली, बाहेर निघता न आल्याने पाण्यात गुदमरून कारमधील दोन वर्षीय बालकासह सात जणांचा मृत्यू झाला. दुचाकीवरील मूळ पालघर जिह्यातील मंगेश कुऱहाडे (25), अजय गोंद (18) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.