
कोल्हापूर येथील ‘माधुरी’ हत्तीणीला गुजरात येथील एका ट्रस्टमध्ये पाठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. धार्मिक विधींच्या हक्कांपेक्षा हत्तीणीचा दर्जेदार आयुष्य जगण्याचा अधिकार अधिक महत्त्वाचा आह़े हत्तीणीचा वापर माणसे व वस्तू वाहून नेण्यासाठी करणे अयोग्य आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
स्वतिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्था मठाची ही हत्तीण आहे. तिला गुजरातला पाठवण्याच्या उच्चाधिकार समितीच्या निर्णयाला या मठाने याचिकेद्वारे आव्हान दिले होते.