सरकार म्हणजे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, जयंत पाटील यांचा हल्ला

हे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’. गल्लीत कितीही गोंधळ घातला तरी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी आज विधानसभेत सरकारवर हल्लाबोल केला.

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून आपण संबोधायचो. पुणे तिथे काय उणे, असे आपण अभिमानाने म्हणायचो; मात्र आता असं म्हणावं लागतंय, पुणे जिथे फक्त घडतात गुन्हे. शहराची प्रचंड बदनामी होत आहे. गुन्हेगारांचा मोर्चा आता नागपूरकडे वळला आहे. सरासरीने तीन दिवसांत एक खुनाची घटना शहरात घडत आहे. या टोळय़ांना कोण पोसते आहे याचा खुलासा झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या शहरात ही परिस्थिती आहे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे काय, असा सवाल त्यांनी केला.

महायुती काळात राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप

शिक्षक भरती घोटाळा

नागपूर जिल्हय़ात शिक्षक भरती घोटाळा झाला. शासनाचे 1 हजार कोटी रुपये हे बोगस शिक्षकांनी फस्त केले आहेत. याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली.