
मोदी शिव्यांचा हिशोब ठेवतात, पण ट्रम्प यांच्या दाव्यांची नोंद ठेवत नाहीत, असा हल्ला काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर केला. ट्रम्प म्हणाले, पाच हिंदुस्थानी जेट्स पाडली. याच मित्राच्या प्रचारासाठी तुम्ही परदेशात जाता. देशाला सत्य जाणून घ्यायचे आहे. मोदींनी स्पष्टपणे सांगावे की आपले एकही जेट पडले नाही, असे खरगे म्हणाले.
नड्डा यांनी मागितली खरगे यांची माफी
मोदी हे जगातील लोकप्रिय नेते आहेत.पण तुम्ही पक्षाशी इतके जोडले गेले आहात की देश दुय्यम बनतो. याच वेदनेमुळे तुम्ही मानसिक संतुलन गमावल्यासारखे बोलत आहात, असे भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बोलताच विरोधकांनी गोंधळ सुरू केला. त्यानंतर नड्डा यांनी जर तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे म्हणत खरगे यांची माफी मागितली.