
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. तसेच 18 ऑगस्टपासून खंडपीठाचे काम सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडून 1 ऑगस्ट रोजी याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे 40 वर्षांच्या लढ्याला यश आले असून कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील खटल्यांचा निपटारा या खंडपीठामार्फत होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरात खंडपीठाची मागणी जोर धरत होती. यासाठी वकिलांनी आंदोलनेही केली होती. या खंडपीठामुळे सुमारे 50,000 ते 60,000 प्रलंबित खटले निकाली निघण्यास मदत होईल. कोल्हापूरातील भौगोलिक स्थान, रेल्वे आणि विमानतळाची सुविधा यामुळे हे खंडपीठ कार्यक्षम ठरेल.
याच बाबत X वर एक पोस्ट करत काँग्रेस आमदार सतेज पाटील म्हणाले आहेत की, “कोल्हापूर खंडपीठाची आज अखेर घोषणा झाली. कोल्हापूरकरांसह पश्चिम महाराष्ट्रातील तमाम पक्षकारांच्या, विधीतज्ञांचा आणि याचिकाकर्त्यांचा गेल्या 40 वर्षांचा लढ्याची आज अखेर स्वप्नपुर्ती झाली. या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या विविध संघटना, संस्था आणि व्यक्तींचे अभिनंदन.”
कोल्हापूर खंडपीठाची आज अखेर घोषणा झाली. कोल्हापूरकरांसह पश्चिम महाराष्ट्रातील तमाम पक्षकारांच्या, विधीतज्ञांचा आणि याचिकाकर्त्यांचा गेल्या 40 वर्षांचा लढ्याची आज अखेर स्वप्नपुर्ती झाली. या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या विविध संघटना, संस्था आणि व्यक्तींचे अभिनंदन!… pic.twitter.com/Y4O13BjG0C
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) August 1, 2025