
तीन हजार कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणी ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती.त्यानंतर आता अनिल अंबानी यांच्याविरोधात ईडीने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. अंबानी यांना येत्या 5 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले आहे.
2017 ते 2019 या काळात येस बँकेकडून रिलायन्स अनिल अंबानी ग्रूपच्या वेगवेगळ्या प्रमाणात एकूण 3 हजार कोटींची कर्जे वितरित करण्यात आली होती; परंतु या सगळय़ा व्यवहारात बेकायदेशीर बाबी घडल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांची चौकशी सुरू आहे. .