तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना बढती

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची पक्षाच्या लोकसभेतील नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अभिषेक बॅनर्जी हे कोलकात्यातील डायमंड हार्बर तीन वेळा निवडून आले आहेत. लोकसभेत ते ज्येष्ठ नेते सुदीप बंदोपाध्याय यांची जागा घेतील.