फरहानचा ’120 बहादूर’चा टीझर प्रदर्शित

फरहान अख्तरच्या ‘120 बहादूर’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये फरहान अख्तर मेजर शैतान सिंह भाटी (पीव्हीसी) यांच्या दमदार भूमिकेत दिसत आहे. 120 हिंदुस्थानी जवान हजारो शत्रूंसमोर उभे ठाकले असून त्यांनी युद्ध जिंकून इतिहास बनवला आहे. या चित्रपटाची शूटिंग लडाख, राजस्थान आणि मुंबई यासारख्या शहरात झाली आहे. हा चित्रपट 21 नोव्हेंबरला चित्रपटग्रहात प्रदर्शित केला जाणार आहे.